
आपल्या आशिर्वादाने पाचव्यांदा निवडणूक जिंकणार – उदय सामंत.
रत्नागिरी कोतवडे जि. प. गटातील कार्यकर्ता मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी वाटद येथील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे जोरदार स्वागत केलं. रत्नागिरीत होत असणारा सामाजिक, पर्यटन, औद्योगिक, शैक्षणिक विकासावर मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संवाद साधला. आपल्या आशिर्वादाने पाचव्यांदा निवडणूक जिंकणार याचा विश्वास असल्याचं ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी येणाऱ्या २० तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीच बटण दाबून विजयी करण्याची विनंती केली. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते.
