अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय समन्वयक अर्चना घारे- परब निलंबित

महाविकास आघाडीतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय समन्वयक अर्चना घारे- परब यांना पक्षाने निलंबित केले आहे.तसे पत्र पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांना दिले आहे.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटला आहे. त्या पक्षाचे उमेदवार राजन तेली हे येथे निवडणूक लढवत आहेत. असे असताना अर्चना घारे- परब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे पक्ष शिस्तीस धरुन नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button