
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरीत घर फोडून लाखोंचा ऐवज लांबविला.
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी-पाटीलवाडी येथे चोरट्याने घर फोडून २ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. राजेंद्र रवींद्र पाटील (४३, रा. चाफेरी पाटीलवाडी, रत्नागिरी) यांच्या मालकीचे हे घर असून त्यांनी जयगड पोलिसांत तक्रार दाखल केली.चोरीला गेलेल्या मुद्देमालात ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व ६५ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. राजेश पाटील यांचे चाफेरी पाटीलवाडी येथे घर असून १२ नोव्हेंबरला चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरामधील देवघरात असलेल्या लोखंडी कपाटातील ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व ६५ हजारांची रोकड चोरून नेली, अशी तक्रार जयगड पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com