मला विजयाची चिंता नाही-दीपक केसरकर.
माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंची सभा झाली आहे, तसेच विरोधी उमेदवारही जास्त असल्याने मला विजयाची चिंता नाही, असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.केसरकर म्हणाले, आडाळी एमआयडीसी वरून अनेक राजकीय पक्ष माझ्या विरोधात विरोधाभास पसरवत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री हब होणार आहे. यासाठी थोडा अवधी लागतो. मात्र, विरोधक नाहक गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. जादूची कांडी फिरवली की लगेच उद्योग सुरू होतात, अशी विरोधकांची धारणा आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मोठ्या उद्योगांचे भूमिपूजन होणार होते. मात्र, मला इतर कामांमुळे पुरेसा वेळ न मिळाल्याने ते राहिले. परंतु, यापुढे ही भूमिपूजने नक्की होणार, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.