
कोकण रेल्वे मधून येणाऱ्या मुंबईतील अट्टल गुन्हेगाराला अटक
मुंबईतील अट्टल गुन्हेगार व गँगस्टर आरोपी सिद्धेश बाळा म्हसकर रा.अंबरनाथ हा कोकण रेल्वेने येत असल्याची खबर पोलिसांना मिळताच ठाणे पोलीस व रत्नागिरी स्थानिक गुन्हा शाखा व चिपळूण पोलीस यांनी शिताफीने त्याला पकडले.आरोपी सिद्धेश यांच्यावर वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत.हा आरोपी कोकण रेल्वेने प्रवास करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचून त्याला चिपळुणात जेरबंद केले.आरोपी गेले महिनाभर मुंबईतून फरारी होता.
www.konkantoday.com