
ग्रामिण भागात घरकुल योजनेतून बांधण्यात आलेली असंख्य घरे घरपट्टीविना
ग्रामिण भागात घरकुल योजनेतून बांधण्यात आलेली असंख्य घरे ही घरपट्टीविना असल्याचे दिसून येत आहे. यामागे ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था समोर येत आहे. तसेच घर बांधणीचे परवानगीचे अधिकार अद्यापही वरिष्ठ स्तरावरच असल्याने बांधण्यात आलेली घरे अनधिकृत ठरली आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या घरकुलांच्या अनेक योजना ग्रामीण भागात मंजूर होवून त्यातून सर्वसामान्य बेघरांना घरकुलांचा लाभ मिळाला. ज्या गावात घरकुल योजनेतून घरे बांधली जातात त्यातील काही घरांच्या घरपट्टीचा विषय संबंधित ग्रामपंचायतीकडून हाताळला जात नसल्याने अनेकांचा घरपट्टी कर थकीत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून अशा घरांना घरपट्टी मोजमाप करून कर लावला जात नसल्याने शासनाचा कर बुडविला जात आहे. www.konkantoday.com