गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट.

जळगाव धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले.तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या समयसूचकतेमुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९:१५ ते ९:३० वाजेच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ ॲम्बुलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली.

काही तरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने चालक राहूल बाविस्कर याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले.वाहनातील डॉ.रफिक अन्सारी, रुग्ण, व नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्बुलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केले. हे वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. पुलाच्या खाली वाहनाचा पत्रा उडाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button