266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 942 जणांचे टपाली मतदान- निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई

रत्नागिरी, दि. 12 (जिमाका) : 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस अशा 942 जणांनी आज टपाली मतदान करुन आपला हक्क बजावला. उद्याही टपाली मतदान या केंद्रावर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

शहरातील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15, दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर आज हे टपाली मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीसांनी केले. एकूण 1567 पैकी आज पहिल्या दिवशी 942 जणांनी आपले मतदान केले. उद्याही याच ठिकाणी टपाली मतदान होणार आहे. यामध्ये दापोलीमधील 71, गुहागरमधील 66, चिपळूणमधील 88, राजापूरमधील 73 आणि इतर जिल्ह्यातील 171 अशा एकूण 942 जणांना समावेश आहे.

दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर भव्य असा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी मतदान करुन आल्यानंतर मोठ्या संख्येने एकमेकांची सेल्फी काढण्यात मतदार गुंतले होते. या फलकावर ‘जागृत नागरिक होऊ या.. अभिमानाने मत देऊ या, जागृत मतदार..सशक्त लोकशाहीची ताकद अशी विविध जनजागृती करणारी घोषवाक्ये आकर्षित करत होती. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मतदारांसाठी मार्गदर्शन करत होते. या केंद्रावर पिण्याची पाण्याची सोय, आरोग्याची सोय त्याचबरोबर टपाली मतदानाचा मोठा सूचना फलक लक्ष वेधून घेत होता. 00

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button