त्यांच्या बॅग मधून काय निघणार.. फारफार तर हात रूमाल आणि कोमट पाणी- राज ठाकरे
उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस तपासली. या आयोगाच्या लोकांनाही कुठे काय तपासावे हे कळत नाही. ज्या उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसे बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या बॅग मधून काय निघणार.फारफार तर त्यांच्या बॅग मधून हात रूमाल आणि कोमट पाणी. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. काय आणि कशाला त्यांच्या बॅग तपासता असं राज म्हणाले.मात्र बॅग तपासल्या म्हणून केवढा तमाशा उद्धव ठाकरे यांनी केला. बॅग चेक करणे हे रुटीन आहे. आमच्याही बॅग तपासल्या गेल्या आहेत. ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे काम आहे. बरं बॅग तपासताना त्याचा व्हिडीओ ही काढला. त्यांना आयकार्ड मागत आहेत. बरं त्या पुढे जाऊन त्यांचे नियुक्ती पत्रही ते मागत आहेत. कोणाला काय विचारावं हे ही समजत नाही. कोणता अधिकारी नियुक्ती पत्र काय खिशात घेवून फिरतात का असा टोला राज यांनी उद्धव यांना लगावला.