
कोकण आपलं आयुष्य, गुंडांच्या हातात देऊ नका : उद्धव ठाकरें
आता सगळ्यांना पटलं आहे, कोकण हे आपलं आयुष्य आहे. ते गुंडांच्या हातात देऊन चालणार नाही. आपली मुलं कोणाचे नोकर म्हणून जाता कामा नये. खाली मुंडी पातळ धोंडे सतत खालीच बघून बोलतात.शिर्डीला जातात पण श्रद्धा नाही आणि सबुरी पण नाही. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर नाव न घेताच निशाणा साधला आहे. पुढे म्हणाले की, हे भक्त नाही डाकू आहेत, दरोडेखोर आहेत.
शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला ऊन, वारा, पाऊस, लाटा यांचा सामना करून देखील तसाच उभा आहे. आणि दाढीवाले म्हणतात काय करणार वार एवढे जोरात होते की पुतळा पडला. त्यांना लाज वाटायला पाहिजे असे सांगताना.राज्यात आमचे सरकार आल्यानंतर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जाईल. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणार आहे. मोदीजी तुम्ही पंधरा लाख देणार होता. आता पंधरा हजार का देता ? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे गद्दारांना लाडकी बहीण योजना आठवली. सरकार आल्यावर अदाणीच्या घशात घातलेली मुंबई परत काढून घेणार आहे, अंधार होऊ शकत नाही कारण हातामध्ये मशाल आहे, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.