
लांजा तालुक्यातील झापडेमधील फणस बागेला लंडनच्या गुंतवणूकदाराची भेट
लाजा तालुक्यातील झापडे गावामध्ये. असलेल्या हरिश्चंद्र देसाई यांच्या फणस बागेला ‘नुकतीच युनायटेड किंग्डम, लंडन येथील नामांकित व्यावसायिक आणि गुंतवणुकदार ग्रॅहम नोबेल व त्यांचा मुलगा यांनी भेट दिली. कोकणातील शेतमाल व त्याचे बाय-प्रोडक्ट्स जागतिक बाजारपेठेत पोहोचावेत यासाठी ते आग्रही असून स्थानिक शेतकरी उत्पादक कंपनीसोबत कार्य करण्याचा निर्णय त्यांनी या भेटीत जाहीर केला.
युवा शेतकरी मिथिलेश देसाई, गौरव सोमवंशी यांच्यासह त्यांचा मित्र जोएल मायकेल (कुबाई) हे विशेष मेहनत घेत आहेत. त्यांच्यावतीने गेल्या पंधरा महिन्यांपासून युनायटेड किंग्डम, इराण व दुबई येथील व्यावसायिक भागीदारांशी सातत्यपूर्ण संपर्क साधत अनेक सॅम्पल्स पाठविण्यात आले होते. या प्रक्रियेतील यशस्वी टप्यानंतर नोबेल यांना प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि त्यांनी कोकणातील शेतमालाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅहम नोबेल हे कृषी क्षेत्रातील व व्हेंल्यू-एंडेड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे त्यांनी देसाई आणि सहकार्यांच्या प्रयत्नांबाबत मोठा रस दाखवला. झापडे येथील ही भेट केवळ एका फणस बागेपुरती मर्यादित न राहता भारतासह युनायटेड किंग्डम, दुबई आणि इराण या देशांदरम्यान कृषी व्यापार व नवनिर्मितीतील संबंध अधिक दृढ करणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली, जात आहे.www.konkantoday.com




