
रत्नागिरी शहरात संकल्प युनिक फाउंडेशन मदतीला धावले, आज पुन्हा केले अंत्यसंस्कार
रत्नागिरी.. संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी या एनजीओ चे कार्य रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सातत्याने सुरु असून गोरगरीब, अडचणीत असलेल्या रुग्णांना ते मदत करीत असतात.काही दिवसांपूर्वी खेड येथील एक सर्वसाधारण आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाचे निधन झाले होते.त्याचे अंत्यसंस्कार एनजीओ तर्फे करण्यात आले होते. मंगळवार दि.4 आॅगस्ट रोजी सकाळी एका संगमेश्वर तालुक्यातील महिलेचे निधन झाले. ती महिला रुग्ण सर्वसाधारण आजाराने त्रस्त होती.शिवाय तिचा कोव्हीड रिपोर्ट निगेटिव्ह होता.या निधन झालेल्या महिलेच्या निकटवर्तीयांनी संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांना फोन करून अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून सर्व शासकीय कागदपत्रे तयार करून म्रुतदेह त्या मयत महिलेच्या मुलांकडे सुपूर्द केले.त्यानंतर संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांचे नेत्त्त्वुत्वाखाली शकील गवाणकर, रुपेश चव्हाण,ईस्माइल नाकाडे, युसुफ शिरगावकर, इरफान शहा यांनी मिरकरवाडा स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. तिच्या मुलाने अग्नी दिला.
हिंदू मयत झालेल्याल्याचे अंत्यसंस्कार एनजीओ च्या मुस्लिम योध्दांनी केले,या ही पुढे आपली संस्था अशा अडचणीच्या प्रसंगी सतत सर्वांसाठी काम करु असे एनजीओ चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.
www.konkantoday.com