
मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व् संस्थानी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
www.konkantoday.com