आता निवडणूक आयोगाच्या पथकाकडून नितीन गडकरी यांच्या बॅगेची तपासणी.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांच्या बॅगा चेक केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.फक्त विरोधकांच्या बॅगा का तपासता? असे म्हणत विरोधकांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याची घटना ताजी असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बॅग तपासल्याची माहिती समोर येत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याची माहिती समोर आलीय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी हे आज हेलिकॉप्टरने किल्लारी येथे आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलीय. नितीन गडकरी ही भाजपचे स्टार प्रचारक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button