राजापूर-साखर येथे आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या.

राजापूर-साखर येथे फिट येण्याच्या आजाराला कंटाळून तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. रूपेश कृष्णा राडये (३२, रा. राजापूर) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास साखर आंबेरवाडी येथील राहत्या घरी घडली. रूपेश याला लहानपणापासूनच फिट येण्याचे आजारपण होते. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून स्वतःहून नायलॉन रस्सी घराच्या मागील पडवीत छताच्या लोखंडी वाशाला रस्सी बांधून गळफास घेतला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button