
ठाकरे शिवसेनेतर्फे रत्नागिरीत ‘होऊ दे चर्चा’
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात होऊ दे चर्चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी नागरिकांशी संवाद साधत उपस्थित केलेल्या प्रश्नांना नागरिकांनी नकारात्मक उत्तरे देताना अच्छे दिन ऐवजी बुरे दिन आल्याचे सांगितले.
रत्नागिरी शहरात घेतलेल्या या उपक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपजिल्हा संघटक संध्या कोसुंबकर, महिला शहर संघटक मनिषा बामणे, राजश्री शिवलकर, साजीद पावसकर यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी पुनसकर यांनी पंतप्रधानांनी खात्यात १५ लाख रुपये भरतो सांगितले होते, ते आले का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर तेथील नागरिकांना मोठ्याने ओरडत ‘नाही’ असे उत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते. ते झाले का, या प्रश्नांना नाही अशीच उत्तरे आली. घरगुती गॅस सिलेंडरचा दर २०१४ साली किती होता? ‘चारशे ते साडेचारशे रुपये’. घरगुती सिलेंडरचा दर आज किती आहे ? तर तो ११०० रुपयांच्या वर आहे. मग आता अच्छे दिन आले की बुरे दिन आले?… ‘बुरे दिन’ अशाप्रकारे होऊ दे चर्चा कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनांची पोलखोल करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
www.konkantoday.com