ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाचा खुलासा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्यावरून महाराष्ट्रात राजकीय टीका सुरु झालेली असतानाच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील ठाकरेंच्या बॅगांची झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.यावरून ठाकरेंनी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. काल वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, आजची घटना लातूरमध्ये घडली आहे.
औसामध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी आजही संताप व्यक्त केला. आजवर कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे हेच पहिले या दोन्ही मतदारसंघांत हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनीही ठाकरेंना जशासतसे उत्तर देत तुम्हीच पहिले आहात असे सांगितले. यावर ठाकरेंनीही मीच पहिला गिऱ्हाईक का, असा सवाल विचारला आहे.
याचा व्हिडीओ ठाकरेंनीच शूट करून सोशल व्हायरल केला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यंत्रणा नियमावलीनुसार आपले काम करत असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत 24 एप्रिल 2024 रोजी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती आणि 21 एप्रिल 2024 रोजी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती, असेही आयोगाने म्हटले आहे.