चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणार्या 13 बांगलादेशी घुसखोरांना अटक.
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणार्या 13 बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने आज (मंगळवार) पहाटे 3.40 वाजता अटक केली.वहिद रियाज सरदार (वय 35), रिजाउल हुसेन करीकर (50), शरिफूल हौजीआर सरदार(28), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (50), हमिद मुस्तफा मुल्ला (45), राजु अहमद हजरतली शेख (31), बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (39), सैदूर रेहमान मोबारक अली (34) आलमगिर हूसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (34), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (32), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (38), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार(45) आणि मोहम्मद लालूट मोंडल सन ऑफ किताब अली (37 सर्व रा.ढाका,बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या तेरा जणांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित 13 बांग्लादेशी घुसखोर जून 2024 पासून अद्यापपर्यंत वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकार्याच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आसिफ सावकार (रा.पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायत हद्दीतील कालरकोंड वाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना मिळून आले.