चिपी विमानतळावरून मुंबई-सिंधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करा -सुरेश प्रभू यांची मागणी.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केला होता. पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्यात विमानतळ कार्यान्वित केले होते. चिपी विमानतळावरून मुंबई-सिंधुदुर्ग -मुंबई अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्या पर्यटन व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी चर्चा करून ही सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली आहे.निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासनाशी बोलून समन्वय घडवून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश व त्याची माहिती घेतली असून त्यासंदभांत कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री किंजरापू नायडू यांनी फोनवर सुरेश प्रभू यांना दिली.www.konkantoday.com