कोकणनगर धडाडीच्या उबाठा गटाच्या अल्पसंख्याक महिला शहर अध्यक्षा सायमा नदाफ काजी यांचा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश
बाळ माने यांना तिसरा धक्का... अल्पसंख्याक महिला शहर अध्यक्षा सायमा काजी शिवसेनेत
*रत्नागिरी* रत्नागिरी शहरातील कोकणगरच्या सामाजिक धडाडीच्या कार्यकर्त्या, उबाठा गटाच्या कट्टर समर्थक सायमा काजी यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
उबाठा गटाच्या कट्टर सर्थक तथा आघाडीचे विद्यमान उमेदवार बाळ माने यांच्या कार्यकर्त्या सायमा काजी यांनी अखेर मशाल वीजवत धनुष्यबाण हाती घेतले आहे. सायमा काजी हे गेली १५ वर्ष महिलांचे प्रश्न असो वा समाजसेवा यात मोठी कामगिरी करत असतात तसेच उबाठा गटाचे कट्टर समर्थक असून ते गेली अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करत होत्या. अखेर त्यांनी कोकणनगरच्या विकासासाठी मंत्री उदय सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षात प्रवेश केला.उदय सामंत यांना कोकणनगर परिसरात मुस्सा काजी, इलू खोपेकर यांच्याबरोबर काम करून मोठे लीड मिळवून देण्यासाठी आज पासून प्रचाराला लागणार असल्याचे सायमा काजी यांनी उदय सामंत यांना शब्द दिला.
सदर सायमा व नदाफ काजी यांना पक्षात आणण्यासाठी शिवसेना नेते सुदेश मयेकर व शिवसेना कार्यकर्ते सिद्धेश शिवलकर यांनी पुढाकार घेतला.
सायमा काजी बरोबर यासीन खान, अबिदा सनदी, झीनत नायकोडे, फलक शाहा, रिजवाना शाहा, तयमन्ना गोलंदाज, अफरीन शेख, आरशीन शेख, मुमताज शेख, शयनाज शेख, सायमा फणसोपकर, सुहाना फणसोपकर, नानीबी शेख, आयशा वस्ता, आयशा गुहागर, माधवी कोली, बेबी धरवडकर, प्रार्थना कोली, पार्वती लिंगायत, सरोजिनी भोसले, कमशाला फणसोपकर, मुमताज पठाण, गुलशान मुजावर, आफरीया काद्री परीनं खान आदींनी प्रवेश केला