रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या तरूणाची आत्महत्या.

रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणार्‍या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्‍वर शिवराम वरपडे (२२, रा. नुतननगर, रत्नागिरी, मुळ रा. नांदेड) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्‍वर याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.ज्ञानेश्‍वर हा मुळचा नांदेड येथील रहिवासी असून तो लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ज्ञानेश्‍वर याचा मित्र त्याला भेटण्यासाठी नूतननगर येथे तो राहत असलेल्या घरी आला. यावेळी ज्ञानेश्‍वर याचा मृतदेह रूमच्या छताचे लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button