रत्नागिरीचा समुद्रकिनारा पुन्हा निळ्या चमकदार लाटांनी चमकू लागला.
पहा निळ्याशार चमकदार लाटांचा व्हिडिओ.....
रत्नागिरीच्या किनार्यावर यावर्षी पुन्हा एकदा निळ्या चमकदार लाटांमुळे समुद्र किनारा रात्रीच्यावेळी चमकू लागला आहे. गेल्या काही वर्षापासून थंडीच्या दिवसात हा अनुभव येवू लागला आहे. साधारण डिसेंबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत सगळ्याच कोकण किनार्यावर थंडीच्या काळात कमी अधिक प्रमाणात या लाटा दिसतात. मात्र यावेळेस नोव्हेंबरमध्येच या लाटा दिसू लागल्याने निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरली आहे.गेल्या काही वर्षापासून याचे प्रमाण वाढल्याने ते नजरेत येवू लागले आहे. थंडीचा ऋतू सुरू झाल्यानंतर हे प्लवंग कोट्यावधीच्या संख्येने रत्नागिरीच्या किनार्यावर येतात. किनार्यावरील लाटा फ्लोरोसंट लाईट पेटवावा तशा प्रकाशमान होतात. किनार्यावर येवून जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्या संख्येत देशाच्या पश्चिम किनार्यावर येत असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. www.konkantoday.com