मुंबई-गोवा महामार्गावरून धावणार्या वाहनांचा वेग मंदावला
मुंबई-गोवा महामार्गावरून धावणार्या वाहनांचा वेग मंदावला आहे. विशेषतः सकाळच्या सुमारास दाट धुक्यामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्याने वाहनांचा वेग कमी झाला आहे. चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून दाट धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीनेच सुरू आहे. www.konkantoday.com