
गुहागर आगाराच्या कारभाराविरोधात भाजपा आक्रमक
गुहागर : तालुका एसटी आगाराकडे व नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन पूर्वीप्रमाणे नियमित एसटी फेर्या सुरू होत नसल्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचे होणारी गैरसोय लक्षात घेता भारतीय जनता पार्टीकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. तरीही या सर्व परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या गुहागर आगाराकडुन या विषयी कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे तालुक्यातील प्रवासी, विद्यार्थ्यांचे फारच गैरसोय आणि शैक्षणिक नुकसान होत होते. यासाठीच गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्र घेतला.
या संदर्भात तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी लेखी निवेदन देऊनही गुहागर आगाराच्या कामकाजात कोणतीही सुधारणा होत नव्हती. आज सुरु केलेल्या फेर्या दुसर्या दिवशी बंद करणे, फेर्यांच्या वेळेत बदल करत असताना कोणतीही पूर्वसूचना न देणे, तालुका अंतर्गतल्या व्यवस्थेचा विचार न करता लांब पल्ल्याच्या फेर्या चालू करणे असे अनेक प्रकार आगार व्यवस्थापकांकडून केले जात होते. कारण मात्र सांगितली जात होती की टायरची उपलब्धता नाही. महामंडळाच्या फायद्याचा विचार न करता फक्त गाड्यांच्या कि.मी. वाढीकडे आगाराच्या अधिकार्यांचे लक्ष होते.
गुहागर आगाराला होणार्या अपुर्या टायरच्या पुरवठ्या करता गुहागर भाजप तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी रत्नागीरी विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांच्याकडे संपर्क करून गुहागर आगाराला तातडीने टायरचा पुरवठा करण्याची मागणी गेले चार दिवस लावून धरली होती आणि त्या मागणीला यश येत दि. 14 जुलै 2022 रोजी 36 टायरची तत्काळ व्यवस्था विभाग नियंत्रकानी केली याबद्दल भाजपाने त्यांचे आभारही व्यक्त केले. टायर आले. मात्र, टायर आवश्यक प्रक्रीयाकरुन ते गाड्याना जोडण्याकामी विजेचा खेळ खंडोबा अडथळा ठरत आहे आणि त्यामुळे आवश्यक फेर्या सोडण्यास विलंब होत असल्याचे आगार व्यवस्थापकानी कारण पुढे केले.