जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला. बँकेत तुमचे पैसे…!

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मागील दीड वर्षामध्ये डिजिटल व्यवहार जनजागृतीवर ५९.२९ कोटी रुपये खर्च केले. त्यानंतरही देशभरातील बँकांमध्ये या काळात २ हजार ८८० कोटी १७ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली. माहिती अधिकार कायद्यातून हा तपशील समोर आला आहे.

*देशभरातील बँकांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान २ लाख ९३ हजार ४८७ सायबर फसवणुकीचे प्रकार घडले. यामध्ये २ हजार ६५ कोटी ६८ लाख रुपये, १ एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ मध्ये १ लाख ४० हजार ९३० प्रकरणांमध्ये ८१४.४९ कोटी रुपये लुबाडले गेले.१ एप्रिल २०२३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान आरबीआयकडून डिजिटल व्यवहार जनजागृतीवर ५९ कोटी २९ लाख ७९ हजार ५४२ रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात सेंट्रल बँक डिजिटल चलन जनजागृतीवर ५ कोटी ४७ लाख ६८ हजार ५९८ रुपये, डिजिटल व्यवहार जनजागृतीवर १९ कोटी ११ लाख ७३ हजार ११९ रुपये, डिजिटल व्यवहार जनजागृती सप्ताहावर १७ कोटी २९ लाख २७ हजार ३२० रुपये, आधार संलग्न व्यवहार जनजागृतीवर १७ कोटी ४१ लाख १० हजार ५०५ रुपये खर्च करण्यात आल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबतची माहिती मागितली होती.देशात डिजिटल व्यवहार वाढले, परंतु डिजिटल फसवणूकही वाढत आहे. आरबीआयने दीड वर्षात डिजिटल व्यवहार जनजागृतीवर सुमारे ६० कोटींचा खर्च केला. त्यानंतरही देशभरातील बँकांमध्ये २ हजार ८८०.१७ कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. ही फसवणूक टाळण्यासाठी प्रभावी उपाय गरजेचे आहेत.* *अभय कोलारकर, माहिती अधिकार कार्यकर्ते, नागपूर.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button