कोकण मार्गावरून धावणार्या नागरकोईल-गांधीधाम एलएचबी डब्यांची धावणार.
कोकण मार्गावरून धावणार्या नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबरपासून ही एक्सप्रेस २२ एलएचबी डब्याची धावणार असल्याचे रेल्वेप्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले.नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. यापूर्वी एक्सप्रेस २३ डब्यांची धावत होती. एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करत एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबरपासून तर परतीच्या प्रवासात २९ नोव्हेंबरपासून एक्सप्रेस एलएचबी डब्यांची धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com