किरण सामंत यांना मुंबईतील कोकणवासियांनी आमदार करण्याचा केला निर्धार.

मुंबई महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. या ठिकाणी गेले पंधरा वर्ष भावनिकतेच्या नावावर मत मागून मतदार संघाचा भकास करणाऱ्या आमदारांना हद्दपार करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सामंत यांना येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याचे फोटो व्हिडिओ अनेक वेळा वायरल झाले त्याचे बातमी प्रकाशित झाल्या मात्र विरोधकांकडून मुंबईकर माझ्यासोबत असल्याचा दावा केला जात होता मात्र येथील मुंबईकरांनीच तो दावा फेल ठरवत आता मुंबई मंडळ सुद्धा विकासाच्या परिवर्तनासाठी एकवटली असून किरण सामंत यांना एक मताने निवडून देऊन विधानसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार मुंबई येथे झालेल्या बैठकांमध्ये मुंबईकरांनी घेतला आहे. किरण सामंत यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील मुंबईकरांनी मुंबई येथे विविध ठिकाणी मिटींगचे आयोजन केले होते.यामध्ये मुंबईतील ग्रामविकास मंडळे आणि पदाधिकारी यांनी बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामध्ये आकांक्षा हॉल बी आर नगर रोड आकांक्षा नगर दिवा आगासन रोड दिवापूर्व, ठाणे, ४००६१२, दुसरी बैठक सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर दादर सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मध्ये शंकर मंदिर जवळ दादर ,मुंबई ४०००२८तर पुढची सभा एकविरा हॉल संयुक्त नगर अचोले क्रॉस रोड,एकविरा अपारमेंट ,अलकापुरी नालासोपारा पूर्व ,पालघर-४०१२०९ अश्या ठिकाणी पार पडल्या. यावेळी किरण सामंत यांच्या साठी येथील मुंबईकरांनी आणि मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

यामध्ये मुंबई येथील मंडळी एकत्रित किरण सामंत यांना पाठिंबा देण्यासाठी स्वतःहून मीटिंगचे आयोजन केले होते. किरण सामंत यांच्यासारखा विकासात्मक नेतृत्व व्हिजन असलेला व्यक्तिमत्व लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक असून त्यांच्या पाठीमागे उभे राहणार ही आमची कोकणवासी यांचे जबाबदारी असल्याचे मत येथील मुंबईकरांनी यावेळेस व्यक्त केले. गेली पंधरा वर्षे भावनिकते वर आणि खोटे बोलून, खोटे आश्वासन देवून त्याआधारावरती राजकारण करणाऱ्या आमदाराला आता लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जागा शिल्लक ठेवणार नसल्याचे निर्धार येथील मुंबईकरांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांनी किरण सामंत यांना हिरवा कंदील दाखवला असून पूर्ण मुंबईतील 15000 मतदार किरण सामंत यांना मतदान करून लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनात सहभागी होणार आहेत. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाचा ध्यास घेऊन किरण सामंत यांना मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते स्वतःहून 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं महत्त्वाचं मत देण्यासाठी आणि किरण सामंतांना लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक दाराची किल्ली देण्यासाठी स्वतःहून गावाकडे येणार असल्याचे त्यांनी या मेळाव्यामध्ये ठरवले आहे.

किरण सामंत यांना मुंबईकरांनी दिलेल्या आशीर्वाद दिले आहेत . गावागावात मिळणारा उत्कृष्ट प्रतिसाद पाहून विरोधकांची हवा गेल्याचे बोलले जातं आहे.गावाबरोबर मुंबईतील मतदारांनी किरण सामंत यांना आशीर्वाद दिल्यामुळे किरण सामंत यांच्या विजयाचे दार मोकळे झाले असून त्यांचे पारडे जड झाले आहे. आता विरोधकांना चेष्टा निंदा आरोप करण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक राहिले नाही त्यामुळे ज्यांना पोट लसुटल आहे ते माझ्यावरती टीका करत राहतील मात्र मी टिकेल उत्तरं न देता लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जनतेची सेवा करेन असा शब्द यावेळेस किरण सामंत यांनी मुंबईकरांना दिला.यावेळी या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ,उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, माजी महापौर रमाकांत मडवी, शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर , शिवसेना विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विश्वास राघव, राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले, राजापूर तालुका संपर्कप्रमुख भास्कर चव्हाण, लांजा तालुका संपर्कप्रमुख मारुती नेमन, शिवसेना विभाग प्रमुख ठाणे सुजित सावंत, दिव्याचे विभाग प्रमुख उमेश भगत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनुजा पवार, माजी जिल्हापरिषद सदस्य बापू शेट्टे, शिवडी विधानसभा संघटक गणेश आडवरेकर, शाखा प्रमुख दिवा बाबा गुरव, अनंत लाखन उल्हास बेर्डे, आदिनाथ कपाळे, यांच्या सहित ग्रामविकास मंडळे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button