हिंमत असेल तर उद्धव ठाकरे दौऱ्यावर असता राणेंनी ठाकरेंना अडवून दाखवावं- परशुराम उपकर

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीय प्रमुखांच्या राज्यात प्रचारसभा आयोजित होत आहेत.याचदरम्यान १३ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे प्रचारसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. याचपार्श्वभूमीवर परशुराम उपकर यांनी नितेश राणे यांना कडव्या शब्दांत आव्हान दिलं आहे. उपरकर म्हणाले की, जर हिंमत असेल तर उद्धव ठाकरे दौऱ्यावर असता राणेंनी ठाकरेंना अडवून दाखवावं. गावातील रस्ता कोणाच्या मालकीचा नाही. कोण य़ावं कोण जावं हे सांगायला गावचे रस्ते राणेंच्या बापाचा नाही. अशा कडव्या शब्दांत उपरकरांनी टीका केली आहे.उपरकर पुढे असंही म्हणाले की, हा सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवा. त्यांच्यासोबत असलेले व तुमच्या वेळी असलेले जुने शिवसैनिक आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अशा सुक्या धमक्यांना कोण घाबरत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्याच स्टाईलने उत्तर देतील, हे राणेंनी लक्षात ठेवावे, असा इशाराशिवसेना नेते , माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button