
डास उत्पत्ती थांबल्यास हिवतापावर नियंत्रण मिळवू शकतो ही जबाबदारी विद्यार्थ्यांसह समाज्यातील प्रत्येक घटकाची – डॉ परशुराम निवेंडकर.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत उपकेंद्र गणपतीपुळे यांचे वतीने बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे *जागतिक हिवताप दिन* साजरा करण्यात आला या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ निवेंडकर यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना हिवतापाची लक्षणे, उपाय, या बरोबरच मुलांनी या मध्ये काय करायला हवे या बाबत भाष्य केले मुलांनी आपल्या घरी, वाडीत, गावात या बाबत जागृती करून कोरडा दिवस पाळणे, पाणी साठवून न ठेवणे तसेच पाणी साठवलेच तर ते व्यवस्थित झाकून ठेवणे, पाण्याची डपकी मोकळी करणे तसेच टेमीफॉक्स चा वापर करणे या बाबत माहिती दिली. डासांचे जीवन चक्र समजावून सांगितले असे विविधआंगी हिवताप बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले या वेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. बिपीन परकर सर यांचे मार्गदर्शना खाली जेष्ठ शिक्षक श्री. पाटील सर यांनी उपस्थित्यांचे स्वागत केले या वेळी आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर,सहाययिका श्रीम. सुप्रिया साखरकर, cho श्रीम. मनाली तारवे आरोग्य सेवक श्री. विक्रम जाधव, आरोग्य सेविका श्रीम. अश्विनी गोवळकर, प्रशाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचन व आभार प्रशाळेचे शिक्षक श्री.अमित जाधव यांनी केले.