राजेश बेंडल, अविनाश लाड यांना ओबीसी जनमोर्चाचा सक्रिय पाठिंबा.
त्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार राजेश रामभाऊ बेंडल आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार अविनाश शांताराम लाड यांना ओबीसी जनमोर्चाने सक्रिय पाठिंबा दर्शवला असल्याचे ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही निवडणूक ओबीसींच्या अस्तित्वाची स्वाभिमानाची आहे ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना ओबीसी मतदारांची ताकद काय आहे हे दाखवून देणार असल्याचे यावेळी श्री. बावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक वर्षे देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना केंद्र सरकार ती करायला तयार नाही त्यामुळे ओबीसींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पार च्या वल्गना करणाऱ्या सरकारला ओबीसी बांधवांनी मतदानाच्या रूपाने त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्र सरकार नेहमीच ओबीसी विरोधी निर्णय घेऊन ओबीसींवर अन्याय करत आहे मराठ्यांना कुणबी जातीचे बोगस दाखले देऊन मागीलधाराने ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ” बावकर यांच्या समवेत ओबीसी जनमोर्चा चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, दीपक राऊत, काका तोडणकर उपस्थित होते.