राजापुरात मोकाट जनावरांची तस्करी? गुरांच्या मालकांचे धाबे दणाणले.

राजापूर शहरासह ग्रामीण भागात दिवसा व रात्री फिरणार्‍या मोकाट गुरांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे वृत्त पसरल्याने जनावरे मोकाट सोडणार्‍या मालकांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे अशा प्रकारे तस्करी करणार्‍या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.शहरात मोकाट फिरणार्‍या जनावरांचा प्रश्‍न कायमच नागरिकांसह दुकानदारांची मोठी डोकेदुखी झालेला आहे.

नगर परिषदेनेही कडक कारवाई काही प्रमाणात केली आहे. तरी सुद्धा काही मालकांकडून आपली जनावरे मोकाट सोडून दिली गेली आहेत. यामुळे रात्री व दिवसा भर बाजारात मोकाट फिरणारी जनावरे दिसून येत आहेत. दर गुरूवारी भरणार्‍या आठवडा बाजारात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही मोकाट सुटलेली गुरे दिवसभर बाजारात फिरत असतात. रात्रीच्यावेळी रस्त्यावर बसलेल्या गुरांना रात्री उशीरा पकडून गाडीत भरून त्याची वाहतूक करण्याचा सपाटा चालवला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button