मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ खासगी बसचा भीषण अपघात…
८ जणांची प्रकृती गंभीर?
खोपोली:—मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात घडला आहे. कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळात आहे. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामधील ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ पहाटे चार वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पहाटे ४ वाजता एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. खोपोलीजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमधील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले आहेत.
कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा खोपोलीजवळ अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उभ्या असलेल्या ट्रकला जोरदर धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना मुंबईतील रुग्णालयात शिफ्ट कऱण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर खोपोलीत वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही वाहने बाजूला गेल्यानंतर सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.