माकडांच्या त्रासाने कोकणातील शेतकर्यांनी शेती सोडली
माकडांच्या त्रासाने कोकणातील शेतकर्यांनी शेती सोडली. अशीच परिस्थिती राहिली तर कोकणातील गावांचे वृद्धाश्रम नक्की होईल. त्यामुळे शासनाने माकडांना उपद्रव्य प्राणी म्हणून घोषित करावे, त्यांना पकडून लांब अभयारण्यात सोडावे किंवा त्यांची नसबंदी करावी. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकर्यांनी हा मुद्दा उमेदवारांसमोर उपस्थित करावा असे आवाहन वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस व गोठणे दोनिवडे सामाजिक कार्यकर्ते यशवंत जड्यार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. अन्यथा कोकण सामुदायिक वृद्धाश्रम झाल्याशिवाय राहणार नाही असेही नमूद केले.www.konkantoday.com