समाजवादी नेते बंधू महाजन यांचे निधन
खेड शहरातील वाणीपेठ येथील रहिवासी समाजवादी नेते आणि खेड नगर परिषदेचे निवृत्त स्वच्छता निरीक्षक विश्वनाथ उर्फ बंधू विकू महाजन यांचे ८६ वर्षी दुःखद निधन झाले जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बॅरिस्टर नाथ पै जॉर्ज फर्नांडिस मधु दंडवते यांच्याबरोबर कार्य केले होते.




