गुरुवारी जिल्ह्यात राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस साजरा करण्यात आला.
रत्नागिरी : जि. प. च्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारी जिल्ह्यात राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील जानेवारी 2024 पासूनची कर्करुग्णांची आकडेवारी 97 असून, त्यापैकी 13 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवसकर्करोगाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम क्युरी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस भारतात कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमार्फत राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, ता. गुहाघर येथे कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे यांनी कर्करोगाबद्दल सखोल माहिती देऊन कर्करोग तपासणी व टाळण्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले.