कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन साळवी तुम्हाला का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करा:- किरण सामंत.
ज्या राजन साळवींना जनतेने गेली १५ वर्षे राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून दिले. त्या जनतेचा विकासात्मक घात आमदार राजन साळवी यांनी केल्याचा आरोप किरण सामंत यांनी केला आहे. किरण सामंत यांनी आमदार राजन साळवी यांना घरचा आहेर दिला असून राजन साळवींनी नुकतीच एका वृत्तवाहिनीवरून किरण सामंत यांच्यावर टीका करत आरोप केले त्यामुळे त्याच्या टीकेला किरण सामंत यांनी राजकीय फटके लगावत चोख उत्तर दिले आहे.ज्या जनतेने गेली ३ टर्म निवडूण दिले त्यांच्यावर विकत शिवसेना पक्षात गेल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला हा निष्ठावंत शिवसैनिकांचा अपमान आहे. ज्यांनी राजन साळवींना मोठे केले त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत उभे राहिले त्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर खालच्या भाषेत टीका करून आरोप करणारा आमदार महाराष्ट्रमध्ये शोधून मिळणार नाही पण तो राजापूर लांजा मतदार संघामध्ये आहे, याचे मोठे दुःख माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे.
आज माझे काम पाहून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील जनता माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे. त्यामुळे राजन साळवी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्या बरोबर आलेला प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी ही माझी ताकद असून ते माझ्या विजयाचे साक्षीदार होणार आहेत. हीच जनता मला जास्तीतजास्त मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.प्रतिस्पर्ध्यांनी घाबरून शस्त्र खाली ठेवली असून त्यांना सभा घेण्यासाठी माणसे शोधावी लागत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिल्लक राहिला नाही. ज्यावेळी राहिलेले पदाधिकारी प्रचाराला जातात तेव्हा त्यांना जनता विचारते १५ वर्षे आमदार राजन साळवींनी काय केले? राजापूर लांजाचा विकासाच भकास केला त्यामुळे जनता त्यांना मतदान करणार नाही हे निश्चित झाले आहे. ही राजन साळवींची अवस्था झालीय असे किरण सामंत यांनी सांगितले.
ज्या पदाधिकारी आणि जनतेवर राजन साळवींनी आरोप केले तीच जनता राजन साळवींना २३ तारखेला जागा दाखवेल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उबाठा मधील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहे. त्या मतदारांमध्ये एखाद्या आपल्या माणसाला सोडायचे आणि त्याच्या सोबत परत फोटो काढून घरवापसी केली असे दाखवण्याचा कार्यक्रम राजन साळवींनी सुरू केला आहे. अजून किती वर्षे भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक राजन साळवी तुम्ही करणार? हे एकदा जाहीर करा.
मात्र येणाऱ्या १० नोव्हेंबर नंतर मोजकेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उबाठा मध्ये शिल्लक राहतील हा किरण सामंतचा शब्द आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन साळवींना का सोडून गेले याचे आत्मपरिक्षण करण्याची त्यांना गरज आहे. राजन साळवींनी १५ वर्षात जी कामे करायला हवी होती ती केली नाही. मात्र ती विकासकामे करण्याचे काम मी महायुतीच्या माध्यमातून सुरू केले. त्यामुळे राजन साळवींच्या पोटशुळ उठले आहे. आता राजन साळवी यांना कळून चुकले आहे की ही जनता आता विकासाच्या मागे आहे, म्हणजेच किरण सामंत यांच्या मागे आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते.मी कुणावरही टीका करत नाही, नाहक कोणाला बोलत नाही. मात्र मला डिवचण्याचे कोणी मनात आणू नका. मी भावनिकतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत नसून विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवून विकास हाच अजेंडा घेऊन पुढे जात आहे. तुम्ही १५ वर्षात काय दिवे लावले हे अख्ख्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पाहिले आहे. त्यामुळे मतदार ठरवतील या मतदार संघाचा आमदार कोण? मला माझ्या मतदारांवरती विश्वास आहे, मी केलेल्या कामांवर विश्वास आहे. त्यामुळे माझं नेतृत्व स्विकारून शिवसेनेमध्ये ज्या ज्या लोकांनी प्रवेश केला आहे त्या लोकांवरती राजन साळवींनी पैसे घेऊन प्रवेश केल्याचा आरोप केला आहे त्याचे मी खंडन करतो. ज्या ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझे नेतृत्व स्विकारले आहे त्यांच्या पाठीशी मी स्वतः खंबीरपणे उभा आहे. मी त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.
राजन साळवी हे कसले निष्ठावंत, निष्ठावंताचे १३ सर्टफिकेट माझ्याकडे आहेत आणि त्यांना निष्ठावंत असे प्रमाणपत्र या महाराष्ट्रात माझ्या शिवाय कोणच देऊ शकत नाही. विधानसभेचे २ लोकसभेचे ४, विधान परिषद ३, राजापूर नगरपरिषद २, लांजा नगर पंचायत २ अशी एकूण १३ सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. याचा विसर राजन साळवींना पडला असेल तर ती आठवण करून देण्यास मला भाग पाडू नका, असा टोला किरण सामंत यांनी राजन साळवींना लगावला आहे.