उदय बनेंपेक्षा बाळ माने उजवे होते म्हणून पक्षाने बाळ माने यांना उमेदवारी दिली – विनायक राऊत.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकार्यांनी ठराव केला म्हणून नाही, तर उदय बने हे स्वतः इच्छूक असल्याचे अनेकवेळा मला बोलले जात होते, म्हणून ते उमेदवारीच्या स्पर्धेत होते. त्यांनी नाखुशी न दाखवता राजेंद्र महाडीक यांच्यासारखे पक्षाच्या प्रवाहात रहावे, अशी अनेक वेळा आमची चर्चा झाली. परंतु वेगवेगळ्या सुत्रांकडून पक्षाने मागविलेल्या अहवालामध्ये उदय बनेंपेक्षा बाळ माने उजवे होत होते, त्यामुळे बनेंना उमेदवारी देण्याऐवजी पक्षाने बाळ माने यांना उमेदवारी दिली.www.konkantoday.com