स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा;
महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा विमा!
मिंध्यांनी खाल्लेले पैसे रोखले तर सर्व योजना राबवता येतील. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष मतदारांना आश्वासनांची रेवडी देत आहे. इतक्या योजना राबवण्यासाठी पैसा कुठून आणणार असे माध्यमांनी या वेळी विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही पूर्ण अभ्यास करूनच ही वचने दिली आहेत. पैसा कुठून आणणार हे आताच सांगितले तर शिवसेना आणि धनुष्यबाण चोरला तशी ती आयडियाही मिंधे चोरतील. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार असे शिवसेनेने सांगितले ते आश्वासनसुद्धा मिंध्यांनी चोरले. त्यांना चोरीशिवाय दुसरे काहीच येत नाही असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मिंधे सरकारने जितका पैसा ज्या पद्धतीने खाल्ला ते प्रकार रोखले गेले तर सर्व काही शक्य आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.मोदी सरकार पंधरा लाख देणार होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. आजपर्यंत ते काही करू शकले नाहीत, ते आता कसे करणार? ती रेवडीच होती, ते जुमलेच होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अच्छे दिन कब आयेंगे…ये जायेंगे तो आयेंगे, अशी मिश्किलीही त्यांनी केली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱयात म्हणाले, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते भारतीय जनता पक्षाबद्दल बोलत होते. कारण भाजपची नाव आता बुडायला लागली आहे. म्हणून ते भाजपच्या लोकांना म्हणाले की, ते एकत्र असतील तर सेफ आहेत, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.
कंत्राटदारांना पैसे मिळावेत म्हणून राज्यावर कर्ज. महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार आहात. आधीच लाखो कोटी रुपये कर्ज राज्य सरकारवर आहे, मग योजनांमध्ये फेरबदल करणार का? असा प्रश्न या वेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कंत्राटदारांना पैसे मिळावेत आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून मिंध्यांना मिळावेत म्हणून ते कर्ज झालेय. मिंधे सरकारने महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवीही तोडल्या. महाविकास आघाडी सरकारने त्या ठेवींमधून कोस्टल रोड केला होता. आमचे सरकार पाडल्यानंतर मोदींची सभा झाली होती. त्यात ते म्हणाले होते की, बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नाही, तो आपल्या मित्रांच्या खिशात गेला पाहिजे. त्यामुळे मिंधे सरकारने रस्त्यांची कामे, मेट्रोची कामे काढली. नियोजनशून्य विकास केला. त्यासाठी बेसुमार पंत्राटे काढली गेली. काही ठिकाणी तर कंत्राटाशिवाय पैसे दिले गेले. धारावीचा प्रकल्पही मुंबईच्या मुळावर येणारा प्रकल्प आहे. तो केवळ धारावीपुरता आहे असे समजू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माहीम शिवसेनेचाच आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची एकही सभा का नाही? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. त्यावर माहीम हा माझा आहे, शिवसेनेचा मतदारसंघ आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कालची महाविकास आघाडीची सभा आणि 17 नोव्हेंबरची सभा यादरम्यान बघितले तर माझ्या सभा बाहेरच आहेत. कारण मुंबईकरांवर माझा विश्वास आहे आणि मुंबईकरांचा माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहे. तरीदेखील मी सर्वांच्या दर्शनाला आणि आशीर्वादासाठी जातोच आहे. एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी गेलो नाही म्हणजे मी दुर्लक्ष करतोय असे नाही. आता दिवसाला चार-पाच सभा घेतल्या तरी सर्व मतदारसंघ पूर्ण करता येणार नाहीत. प्रवासाचा वेळ आणि उन्हाच्या वेळा पाहिल्या तर रोज चार सभांच्या वर जास्त सभा होतील असे मला वाटत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर एक बकालपणा आणण्याचा सरकारचा डाव आहे. तोदेखील महाविकास आघाडीचे सरकार हाणून पाडेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल. त्यातले अर्धेअधिक अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायचे, दहिसर किंवा मिठागरांच्या ठिकाणी पाठवायचे असे सरकारचे चालले आहे. त्यासाठी हजारो एकर जमीन अदानींना दिलेली आहे आणि तसे आदेश निघालेले आहेत. मिंधे सरकारचा तो डाव आमचे सरकार आल्यानंतर हाणून पाडू, असे उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रकाशनावेळी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. कोळीवाडे आणि गावठाणांचे अस्तित्व पुसून तिथे क्लस्टर करण्याचा सरकारने काढलेला जीआरही रद्द करू, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा वचननामा काही दिवसांत येईलच, पण स्वतंत्र वचननामा आणला म्हणून शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली असे मुळीच नाही. युतीमध्ये होतो तेव्हाही शिवसेनेने स्वतःचा वचननामा आणला होता असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसेनेच्या वचननाम्यात हवेतल्या गोष्टी नाहीत, तर शिवसेना नेहमी करणार आहे तेच बोलते आणि बोलते तेच करते असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.मागील अडीच वर्षे महाराष्ट्र अराजक अनुभवत आहे. शेती उजाड, तर गावे भकास झाली आहेत. शहरे बकाल होत आहेत. गावात काय महाराष्ट्रात कुठेही रोजगाराच्या संधी सापडत नाहीत. या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढावेच लागेल. त्यादृष्टीनेच ही वचने दिली आहेत. जनतेने त्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद द्यावा.अदानीला आंदण दिलेली मुंबईतील जमीन परत घेऊन मुंबईच्या विविध भागांमध्ये एक लाख भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे घर किफायतशीर दरात देणार.
धारावीकरांना त्यांच्या उद्योग-व्यवसायासाठी हक्काच्या सुविधांसह जिथल्या तिथे घर देणारी नवीन निविदा काढणार.* कष्टकऱ्यांना फक्त 10 रुपयांत पोटभर, पौष्टिक जेवण देणाऱया शिवभोजन योजनेचा विस्तार करणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
महिलांना एसटी तसेच बेस्ट, टीएमटी, पीएमपीएमएल, एनएमएमटी आदींमध्ये बस प्रवास मोफत करणार. महिलांना लोकल ट्रेनमधून मोफत प्रवासासाठी पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार.
प्रत्येक जिह्यात दर तीन महिन्याला रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार.