
राजीवडा येथील उबाठा अल्पसंख्यांक शहर प्रमुख जकी खान यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दणका दिला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्यांक शहरप्रमुख जकी खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे कार्यकर्ते तनवीर जमादार, साहिल पठाण, अजीम चिकटे, रिजवान मुजावर यांच्या पुढाकाराने या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी नामदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक विकास पाटील, माजी नगरसेवक निमेश नायर, माजी नगरसेविका स्मितल पावस्कर, माजी नगरसेवक साळवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जकी खान यांच्यासह रशीद काजी, फरहान कादरी, मुबारक कादरी, नवीन मुल्ला, फकी जमादार, महबूब मुल्ला, सरजील भट्टीकडे, मुझे जमादार, समीर कादरी, मंजूर शेख, कौसर खान, सुफियान कादरी, शब्बीर खान, असच खान, सुभान शेख व हजारो कार्यकर्ते यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.