मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून अनेक ठिकाणी कडेकोट नाकाबंदी आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत.एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री एका इलेक्ट्रिशियनकडे एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची सोन्याची पावडर असलेले बॉल सापडले. मूळचा चेन्नईचा असलेल्या इलेक्ट्रिशियनचे नावं अब्दुलकर अब्दुल मजीद असं आहे. त्यानं डोंगरीतील शकील नावाच्या व्यक्तीकडून हे चेंडू घेतले होते. तिथून हे अंधेरीत एका व्यक्तीकडे द्यायचे होते. पण संबंधित व्यक्तीकडे पोहोचवण्याआधीच इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अटक केलीय.