
मंडणगड बोरीचा माळ येथे विवाहितेची आत्महत्या.
सध्या मंडणगड बोरीचा माळ-मेढेचाळ येथे राहणार्या व मूळच्या कराड-उंब्रज येथील शितल दीपक गायकवाड (३१) या वावाहितेने मेढेचाळ येथील राहत्या घरी मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत मंडणगड पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
गायकवाड यांनी मेढेचाळ येथील घरी घरात कोणी नसताना अज्ञात कारणावरून घरातील आतील खोलीमध्ये सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. ही बाब शेजार्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना मंडणगड ग्रामीण रूग्णालयत दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.www.konkantoday.com