निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर ग्रुप सदस्यानी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

आज केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची निसर्गरम्य संगमेश्वर चिपळूण या गृपच्या सदस्यानी भेट घेतली. यावेळी रेल्वे गाड्यांच्या थांब्यांसह कोंकण रेल्वे शी संबधित विविध विषयांवर चर्चा झाली.केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची आज संगमेश्वर रेल्वे स्थानकांवर 3 गाड्यांच्या थांब्याच्या प्रलंबीत मागणी विषयी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या गृपच्या सदस्यानी भेट घेतली.

B bnया वेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि यावर आपण योग्य ती कार्यवाही करू असे यावेळी श्री वैष्णव यानी सांगितले.या प्रसंगी ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन,समीर सप्रे,दीपक पवार, गणपत दाभोलकर,जगदीश कदम अशोक मुंडेकर आणि मुकुंद सनगरे उपस्थित होते.आपल्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन सविस्तर चर्चा केल्याबद्दल श्री अश्विनी वैष्णव यांचे संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button