निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररीत्या होणार्‍या दारू वाहतुकीला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागही सतर्क

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवली यांना महामार्गावर गस्त घालत असताना एक गाडी भरधाव वेगाने तळेरेतून वैभववाडीच्या दिशेने जाताना दिसली.गाडीचा पाठलाग केला असता वैभववाडी स्टेशन रोडनजीक झायलो गाडी रस्त्यावर सोडून चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या गाडीत 1 लाख 20 हजारांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. या विभागाचे कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सूरज चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गाडीत 1 लाख 20 हजाराच्या गोवा बनावट दारूसह 5 लाख 50 हजार रु.ची गाडी असा मिळून 6 लाख 70 हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 8.30 ते 9.30 वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button