चिपळुणात नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ११ लाखांची फसवणूक.
नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ४८ हजार १०५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी हिदायत चौगुले (३१, रा. खेर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
२१ ते ३१ ऑक्टोबर या मुदतीत मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने चौगुले यांच्या मोबाईल व्हॉटसऍप नंबरवर डेव्हनेट जॉब इंडिया ऑर्गनायझेशन या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. असा मेसेज करत नोकरीचे आमिष दाखविले. यातूनच चौगुले यांची ११ लाख ४८ हजार १०५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.www.konkantoday.com