खेडशी वॉर्ड क्र. ५ मधील उबाठा गटाचा शिवसेनेत प्रवेश….

उदय सामंत यांच्या शिवसेनेची ताकत वाढली.

रत्नागिरी, :- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी वॉर्ड क्र. ५ मधील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेची ताकत वाढवली आहे.

शाखाप्रमुख सिद्धेश जोशी यांच्यासह सागर खेत्री, सचिन गुरव,तुषार जोशी,अविनाश जोशी,रोहन भोंदे,ऋषी जोशी,दत्ता मासाळ,संतोष शिंदे,प्रशांत सावंत, विशाल पाटील, मानव पाटील,प्रणय जाधव,गणेश काळे,करण खेत्री, रितेश खेत्री,सुभाष खांडेकर,हेमंत बोडस,निखिल सावंत,आशिष चव्हाण,ऋषिकेश चव्हाण,मंजुनाथ अनवान,निशांत कसबेकर,नीरज लोखंडे,सिद्धराज कांबळे,बल्लाळ गोवेकर,दीपक पवार,वैभव कामेरकर यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज स्वीकारला.

या प्रसंगी युवासेना कोकण विस्तारक परशुराम कदम,मिरजोळे युवासेना विभाग प्रमुख हर्षराज पाटील, युवासेना उपशाखा प्रमुख विनोद पाडावे,मिरजोळे सरपंच रत्नदीप पाटील,युवासेना उप शाखाप्रमुख प्रथमेश पाटील,शिवसेनेचे योगेश काताळकर, विकास कामेरकर, दिपक पवार उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना शाखाप्रमुख सिद्धेश जोशी यांनी सांगितले की, शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि पक्षाच्या विकासाच्या दृष्टीने ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकत आणखीन वाढेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button