कृषी, पर्यटन, उद्योगधंद्यातून रोजगार निर्मिती करणार -शेखर निकम.
गेल्या पाच वर्षात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून अडीच हजार कोटीहून अधिक विकासाची कामे झाली आहेत. यापुढेही विकासाची कामे होतच राहतील, परंतु आता पुढील काळात पर्यटन, कृषी, उद्योगधंदे यांच्या माध्यमातून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात रोजगार निर्मिती करण्याचे आपले ध्येय असल्याचे आमदार व महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या आमदार शेखर निकम यांनी आपल्या पाच वर्षातील कार्य अहवालाच्या प्रकाशनासह निवडणुकीतील संकल्पनामा बुधवारी सावर्डे येथे जाहीर केला याप्रसंगी ते बोलत होते.www.konkantoday.com