आंबा फक्त ७०, काजू ६५ रुपये प्रतिझाड विमा रक्कम, शेतकर्यांना फटका.
रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल मंडळांतर्गत बसवण्यात आलेल्या तापमान मापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. हवामानाची अचूक नोंद न झाल्याने आंबा व काजू पिकासाठी जाहीर झालेला परतावा हा अत्यंत कमी आहे. परताव्याची ही रक्कम खात्यात जमा झाली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, उच्चतम तापमान, नीच्चांकी तापमान यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बागायतदारांना नुकसान भरपाई दिली जाते. www.konkantoday.com