जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर.

जम्मू काश्मीरमध्ये सध्या पुन्हा एकदा कलम 370 चा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा अधिवेशनातील तिसऱ्या दिवशी कलम 370 पुन्हा कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.यावरून आता भाजप आणि नॅशनल कॉन्फ्रेंस आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. या विषयावर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “हे एक सकारात्मक पाऊल आहे. पण सरकारने त्यामध्ये अधिक स्पष्टता आणण्याची गरज आहे. पीडीपीने नेहमीच कलम 370 पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. पीडीपी सत्तेत असती तर ती अधिक स्पष्टतेने मांडली असती.” असे विधान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button