इंडिया आघाडीच्या सभेच्या वेळी उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले तर काँग्रेस शिवसेना कार्यकर्त्यांच्यात बाचाबाची.
वांद्रे कुर्ला संकुलातील इंडिया आघाडीची सभा संपन्न झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे त्यांच्या गाडीचे चालक आणि शिवसैनिकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली.हे पाहून काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दोन्ही बाजूकडील तणाव निवळला.इंडिया आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ बीकेसी मैदानावर फोडला. या सभेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सर्व प्रमुख नेत्यांची भाषणे आणि महाविकास आघाडीचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर सभेचा समारोप झाला.सभेचा समारोप झाल्यानंतर प्रमुख नेते व्हीआयपी एक्झिट गेटने बाहेर पडले. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे एकाच कारमधून जाणार होते. त्यांच्या गाडीच्या चालकांची शिवसैनिकांसोबत काहीशी बाचाबाची झाली. जवळपास तीन ते चार मिनिटे हे भांडण सुरू होते.उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या नेत्यांनाही गेटवर अडवलेमहाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच VIP गेटमधून आत सोडलं. मात्र त्यांच्या सोबत आलेल्यांना पोलिसांनी रोखलं. सहकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांना आत सोडण्यास नकार दिल्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे माघारी आले आणि पोलिसांवरसंतापले. ‘आधी सगळ्यांना आत घ्या, कोण आहे तो? त्याचं नाव घ्या’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि इतर सुरक्षारक्षकांना VIP गेटमधून आत सोडलं.