
दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात ग्राम समिती पुन्हा कार्यान्वित करणार -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात ग्राम समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.हसन मुश्रीफ म्हणाले, “करोना संसर्गाचा फैलाव राज्यभर वाढत असल्याने कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली जात आहे. करोना रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन केले जाईल. त्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवली जाईल.”
www.konkantoday.com